Home » एकेकाळी दीपिका पादुकोण होती ‘या’ प्रसिध्द क्रिकेटरच्या प्रेमात वेडी,या कारणामुळे झाले दोघांचे ब्रेकअप…
Entertainment

एकेकाळी दीपिका पादुकोण होती ‘या’ प्रसिध्द क्रिकेटरच्या प्रेमात वेडी,या कारणामुळे झाले दोघांचे ब्रेकअप…

क्रिकेट जगताशी निगडित स्टार्सबद्दल बोलायचे झाले तर आज अशा अनेक क्रिकेटर्सची नावे आहेत,ज्यांचे बॉलीवूड अभिनेत्रींसोबत प्रेमप्रकरण आणि नातेसंबंधांच्या बातम्या समोर आल्या आहेत.असे काही क्रिकेटर्स आहे ज्यांचे प्रेम पूर्ण झाले आणि त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले.पण दुसरीकडे काही असेही क्रिकेटर्सही आहेत ज्यांचे नाते अपूर्ण राहिले.अशाच एका जोडप्यात क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण या जोडीचा समावेश आहे,ज्यांच्या प्रेमप्रकरणाच्या आणि नात्याच्या बातम्या एकेकाळी खूप चर्चेत होत्या पण त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.आपण आज त्यांचे नाते का तुटले हे बघणार आहोत… 

दीपिकाला युवराजचा पझेसिव्ह स्वभाव आवडला नाही…

मीडिया रिपोर्ट्सनुसार,क्रिकेटर युवराज सिंह आणि बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण २००७ मध्ये टी-20 कप दरम्यान भेटले होते,त्यानंतर दोघेही अनेक कार्यक्रम आणि फंक्शन्समध्ये एकत्र दिसले होते.दीपिकाच्या सांगण्यावरून युवराज सिंगने आपले लांब केस लहान केले,अशा बातम्याही त्या दिवसांत आल्या होत्या.मात्र या दोघांचे प्रेम फार काळ टिकू शकले नाही आणि नंतर ब्रेकअप होऊन त्यांचे नाते संपुष्टात आले.ब्रेकअपनंतर दीपिकाला युवराज सिंगचा पझेसिव्ह स्वभाव आवडत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे रिलेशनशिपमध्ये यश आले नाही.

एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ मिळू शकला नाही…

अशा परिस्थितीत युवराज सिंगने या प्रकरणी टेलिग्राफशी संवाद साधताना सांगितले होते की,त्या दिवसात तो दक्षिण आफ्रिकेतून परतला होता,तेव्हा एका कॉमन फ्रेंडद्वारे दीपिकाला भेटला होता.तिथेच दीपिका आणि युवराज एकमेकांना आवडले होते आणि इथूनच एकमेकांबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छाही निर्माण झाली होती.मात्र, या दोघांनी एकमेकांना जाणून घेण्यासाठी फारसा वेळ दिला नाही.

युवराजने सांगितले की,जसजसे काही घडत गेले,दीपिका आणि तो दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे जात राहिले. यानंतर,संभाषणात दीपिकाकडे बोट दाखवत तो म्हणाला की पूर्वी ती त्याच्यासोबत होती,पण आता ती तिच्या आयुष्यात दुसर्‍या व्यक्तीसोबत आहे आणि ही तीची वैयक्तिक निवड आहे.युवराजने शेवटी सांगितले की,मी कोणावर आरोप करत नाही,फक्त एक तथ्य सांगत आहे.

दीपिका पदुकोणच्या आधी या अभिनेत्रींवर युवराजचे मन होते…

दीपिका पदुकोणच्या आधी युवराज सिंगचे नाव बॉलिवूडच्या आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडले गेले होते.या बॉलिवूड अभिनेत्रींचे नाव किम शर्मा होते,जिला युवराजने काही काळ डेटही केले होते.मात्र,नंतर ३९ नोव्हेंबर २०१६ रोजी युवराज सिंगने अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्नगाठ बांधली.