बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आपल्या अभिनयाप्रमाणेच फिटनेस मुळे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.गेली अनेक वर्षे बिपाशा चित्रपटांमध्ये दिसली नाही मात्र ती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. बॉलीवूड मध्ये आजही सौंदर्याच्या कल्पना या गोरा रंग व अन्य काही विशिष्ट परिमाणांना धरून असतात.बिपाशा बसु चित्रपट सृष्टी मध्ये आली तेव्हा तिचा रंग हा सावळा होता.मात्र या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता तिने आपले स्वतःचे असे वेगळे स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले.
या संपूर्ण प्रवासामध्ये बिपाशाला अनेकदा तिच्या रंगावरून अपमान सहन करावा लागला आहे.7 जानेवारीला बिपाशाने आपला 43 वा वाढदिवस साजरा केला.बॉलिवुडमध्ये अभिनेत्रींमध्ये अनेकदा भांडणे झाले ते आपण ऐकले आहे.आज बिपाशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अजनबी या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा आणि करीना यांच्यामध्ये झालेल्या व गाजलेल्या भांडणाचा किस्सा जाणून घेणार आहोत.
या चित्रपटामध्ये बॉबी देओल,करीना कपूर,अक्षय कुमार आणि बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका होत्या.या चित्रपटाच्या वेळी करीना आणि बिपाशा मध्ये खूप जोरदार भांडण झाले होते व यानंतर या दोघींमध्ये पुन्हा एकदा मनोमिलन होईल का याच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या.बिपाशा आणि करीना मध्ये अजनबी चित्रपटाचे सेटवर ड्रेस वरून खूप भांडण झाले होते व यावेळी करीना कपूर इतकी रागावली होती कि तिने बिपाशाच्या कानशिलात लगावली व तिच्या रंगावरून टोमणे मारत तिला ‘काली बिल्ली’ असे म्हटले होते.
यानंतर एका मुलाखतीने जेव्हा या भांडणाचा विषय निघाला तेव्हा बिपाशाने या अतिशय छोट्या मुद्द्याला मोठे बनवल्याचे म्हटले होते.जर करिनाला ड्रेस बद्दल काही आक्षेप होता तर तिने याबद्दल ड्रेस डिझायनर कडे खुलासा मागायचा होता मला यामध्ये विनाकारण ओढण्याची काहीच गरज नव्हती.करीनाचे त्यावेळचे वर्तन हे अतिशय बालिश होते असेही बिपाशाने म्हटले व इथून पुढे भविष्यात आपण करीना सोबत काम करणार नाही असे सुद्धा तिने सांगितले होते.या मुलाखतीनंतर करीनाने बिपाशाला आपल्या टॅलेंटबद्दल असुरक्षितता असल्याचे वक्तव्य केले होते.
बिपाशा बसु चा जन्म एका बंगाली कुटुंबामध्ये 1978 साली झाला.बिपाशा बसूला बिदिशा आणि विजेता या दोन बहिणी आहेत. बिपाशाला महाविद्यालयीन आयुष्यामध्ये अभिनय किंवा मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे नव्हते मात्र तिच्या साठी स्वतःहून संधी चालत आल्या व तिने या संधींचे सोने केले.अजनबी हा बिपाशाचा पहिला चित्रपट होता.हा चित्रपट खूप यशस्वी ठरला व बिपाशाच्या कामाचे कौतुकही झाले.
यानंतर बिपाशाने विविध चित्रपटांमध्ये काम केले.यामध्ये बहुतांश चित्रपटात तिच्या भूमिका या भयपटात होत्या.राज,राज थ्री, क्रीचर,अलोन,डरना जरुरी है या चित्रपटांमध्ये बिपाशाने भूमिका केल्यावर आहेत.रेस या चित्रपटातील बिपाशाच्या अभिनयाचे ही कौतुक झाले.करण सिंह ग्रोवर या अभिनेत्यासोबत बिपाशाने विवाह केला आहे व सध्या आपले वैवाहिक जीवन ती आनंदाने व्यतीत करत आहे.
Add Comment