Home » अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी काजोल ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात होती वेडी…
Celebrities

अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी काजोल ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात होती वेडी…

काजोल आणि अजय देवगण हे जोडपे बॉलिवूडमधील आदर्श जोडपे मानले जाते.बाजीगर या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेल्या काजोल ने गेली अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर आपल्या अभिनयाने राज्य केले आहे.कुछ कुछ होता है चित्रपटातील अंजली हे पात्र तर काजोलच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट होता.कुछ कुछ होता है प्रमाणे दुश्मन,इश्क,हम आपके दिल मे रहते है,कभी खुशी कभी गम या चित्रपटांमध्ये काजोलने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.अभिनय क्षेत्रामध्ये एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपली पात्रता सिद्ध करत असताना आपल्या खासगी आयुष्य मध्ये सुद्धा काजोल एक आदर्श पत्नी व आई म्हणून ओळखली जाते.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मुलगी असलेल्या काजोलने आपल्या अभिनय कौशल्य व मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये अगदी अल्पावधीतच नावलौकिक मिळवला.बॉलिवूडमध्ये साधारण समज असा आहे की लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीचे अभिनयातील करिअर संपुष्टात येते मात्र या सर्व समजांना चुकीचे ठरवत वयाच्या पंचविसाव्या वर्षी बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय देवगण यांच्यासोबत विवाह करून काजोल अतिशय सुखाने संसार करत आहे.आपल्या करिअरच्या यशाच्या उच्च शिखरावर असताना काजोलने विवाह करण्याचे ठरवले तेव्हा ती आपल्या दिसण्याबद्दल काहीशी बेफिकीर होती.

तर अजय देवगण आपल्या अभिनय,दिसणे याबद्दल अतिशय जागरुक होता.मात्र कदाचित त्यांचे विरुद्ध स्वभावाच त्यांना एकमेकांकडे आकृष्ट करण्यास कारणीभूत ठरले असावेत.एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या जोडप्याने विवाहाचा निर्णय घेतला.अगोदर जवळपास नऊ वर्षे काजोल बॉलिवूडमध्ये सक्रिय होती व सर्वात महागडी आणि अभिनयाचे खणखणीत नाणे मानले जाणारे अभिनेत्री होती.काजोल वर्षातून चार ते पाच चित्रपटांमध्ये हमखास दिसत असे मात्र लग्नानंतर आपल्या स्वभावामध्ये व करिअर प्रति अनेक बदल तिने जाणीवपूर्वक केले.

आपल्या घरातील व कुटुंबा प्रतीच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी चित्रपटसृष्टीत सध्या काही निवडक चित्रपटांमध्ये ती काम करते व जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवण्यावर भर असतो.1995 साली चित्रपटाच्या सेटवर झालेल्या पहिल्या भेटीमध्ये या दोघांनाही एकमेकां विषयी फारसे स्वारस्य वाटले नाही.काजोल ही बडबडी,उद्धट स्वभावाची व्यक्ती वाटल्यामुळे तिला दुसऱ्यांदा भेटण्याची इच्छा अजयला होत नव्हती.मात्र कालांतराने या दोघांमध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.अजय देवगण सध्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.

काजोल आणि अजय देवगण यांची प्रेमकथा ही खूपच रंजक आहे.ज्यावेळी हे दोघे चांगले मित्र बनले त्यावेळी या दोघांच्याही आयुष्यात अन्य कोणीतरी होते.हे दोघेही अन्य व्यक्तींना डेट करत होते.काजोल ही आपला खूप जुना मित्र कार्तिक मेहता सोबत रिलेशनशिपमध्ये होती.तर अजय देवगन हा करिष्मा कपूर सोबत डेट करत होता.या दोघांनाही एकमेकांच्या आयुष्यातील या प्रेम संबंधांची कल्पना होती.गुंडाराज या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी कार्तिक आणि काजोल मध्ये काही वाद निर्माण झाले होते.त्यासाठी काजोल ही अजय देवगन चा सल्ला घेत असे.मात्र तरीही कार्तिक आणि तिच्या मधील संबंध सुधारू शकले नाही. काही काळानंतर करिष्मा आणि अजय देवगण यांचे सुद्धा ब्रेकअप झाले.आतापर्यंत चांगले मित्र बनलेल्या काजोल आणि अजय देवगण यांनी यानंतर एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.