Home » ऐश्वर्याला आपली आई व अमिताभला आपले आजोबा म्हणणारा हा मुलगा घेतो एका दिवसाचे इतके मानधन…
Celebrities

ऐश्वर्याला आपली आई व अमिताभला आपले आजोबा म्हणणारा हा मुलगा घेतो एका दिवसाचे इतके मानधन…

कपिल शर्मा कॉमेडी शो  हा विनोदी कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.हा शो विनोदी कार्यक्रमांच्या यादीमध्ये सध्याचा आघाडीचा कार्यक्रम आहे.या शोची लोकप्रियता खूप जास्त आहे व प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा कार्यक्रम खूप आवडीने पाहते.आत्तापर्यंतच्या टीआरपीच्या यादीमध्ये हा शो आघाडीवरच राहिलेला आहे.केवळ भारतामध्येच नव्हे तर परदेशात सुद्धा या कार्यक्रमाला खूप आवडीने पाहिला जाते.

कपिल शर्मा या विनोद वीराने व अभिनेत्याने या शोची निर्मिती केली आहे व तो या कार्यक्रमाला होस्ट करतो.कपिल शर्मा या कार्यक्रमाने टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांना एका वेगळ्या उंचीवर तर नेलेच आहे पण या कार्यक्रमामध्ये काम करणार्‍या कलाकारांचे आयुष्य सुद्धा पूर्णपणे बदलून टाकले आहे .या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता व प्रसिद्धी यामुळे या कार्यक्रमामध्ये काम करणार्‍या कलाकारांचे मानधन सुद्धा खूप वाढले आहे व त्यांचे आयुष्य हे जणूकाही जमिनीवरून अगदी आकाशाला हात लावण्यासारखे झाले आहे.

या कॉमेडी शोमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराकडे सध्या कोट्यवधींची संपत्ती आहे. या शोमध्ये एक लहान मुलगा सुद्धा काम करतो. या मुलाला सगळेजण प्रेमाने खजूर असे संबोधतात. खजूर या पात्राची भूमिका साकारणाऱ्या या मुलाकडे कधी काळी दोन वेळचे जेवण सुद्धा मिळण्याची भ्रांत होती. मात्र कपिल शर्माने या कार्यक्रमामध्ये त्याला संधी देऊन त्याच्या आयुष्याचे सोने केले. कपिल शर्मा मधील खजूर च्या कामाची सर्वत्र स्तुती केली गेली व यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे पालटले. आजघडीला खजूर कडे कशाचीही कमी नाही व तो खूप चांगले जीवन व्यतीत करत आहे. या शोमध्ये जेव्हा ऐश्वर्या राय आली होती तेव्हा ऐश्वर्याने सुद्धा खजूर च्या कामाची स्तुती केली होती. त्यावेळी  खजूर ने ऐश्वर्याला आपली आई व अमिताभ बच्चन यांना आपले आजोबा असल्याचे सांगितले होते.

खजूर चे मूळ नाव कार्तिकेय असे आहे. कार्तिकेय हा केवळ 13 वर्षांचा आहे. या शोच्या माध्यमातून इतक्‍या कमी वयात कार्तिकेयला खूप प्रसिद्धी मिळाली व सोशल मीडियावर सुद्धा त्याच्या अभिनयाची चर्चा होत असते.खजूर अर्थात कार्तिकेय कपिल शर्मा च्या एका भागाचे दीड लाख रुपये इतके मानधन  घेतो.इतक्या कमी वयामध्ये एका दिवसासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात मानधन घेणारा हा अभिनेता सध्या खूपच ऐषोरामाचे जीवन जगत आहे.