Home » कोणताही चित्रपट किंवा जाहिरातींमध्ये काम न करता देखील रेखा जगते राणी सारखे आयुष्य,येथून येतात करोडो रुपये…
Celebrities

कोणताही चित्रपट किंवा जाहिरातींमध्ये काम न करता देखील रेखा जगते राणी सारखे आयुष्य,येथून येतात करोडो रुपये…

सौंदर्य हे ईश्वराची देणगी मानले जाते.काही व्यक्तींना चिरतारुण्य ची देणगी ही निसर्गतः हाच मिळालेली असते.बॉलिवूडमधील प्लास्टिक सर्जरी व मेकअपच्या थरांनी स्वतःला कायम तरूण राखणाऱ्या पिढीमध्ये आज सुदधा जेव्हा चिरतारुण्य हा शब्द उच्चारला जातो तेव्हा रेखाजी यांचे नाव समोर येते.रेखाजी हे मूर्तिमंत सौंदर्याचे एक उदाहरणच आहे.वयाच्या साठीनंतरही रेखा जी आज सुद्धा आपल्या नजाकती मुळे व डोळ्यांनी समोरच्याला घायाळ करून टाकतात.आजही रेखाजींचा फिटनेस हा तरुण अभिनेत्रींना लाजवणारा आहे.

मात्र एक काळ असा होता जेव्हा रेखाजी त्यांच्या साध्या रहाणीमुळे त्यांना अनेक ठिकाणी दिग्दर्शकांनी नाकारले होते.त्यांच्या सावळ्या रंगामुळे त्यांना कामाच्या ऑफर्स मिळत नसत.मात्र या सर्व प्रकारांना न घाबरता रेखाजी नी स्वतःवर मेहनत घेतली व दो अंजाने या चित्रपटातून जेव्हा त्या समोर आल्या तेव्हा त्यांच्या लूकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.एखाद्या पुरस्कार सोहळा असो किंवा फॅशन शो रेखाजी आल्यावर सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळतात.गेली अनेक वर्षे रेखा जींचे चित्रपटांमध्ये किंवा जाहिरातींमध्ये दर्शन झालेले नाही.

रेखाजींनी चित्रपटांमध्ये काम करावे अशी त्यांच्या चाहत्यांची खूप इच्छा आहे.रेखा यांची राहणे आज सुद्धा एक प्रकारचे फॅशन स्टेटमेंट मानले जाते.त्यांच्या राहणीमानासाठी जो प्रचंड खर्च येतो तो त्या कसा भागवतात हा प्रश्न अनेकांना पडतो.कारण गेली अनेक वर्षे त्या चित्रपट किंवा जाहिरातींमध्ये दिसत नाही.रेखाजी चित्रपटांमध्ये प्रत्यक्ष अभिनय करत नसल्या तरीही त्या चित्रपटांशी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या असतात.दक्षिण भारतामध्ये व मुंबईमध्ये त्यांनी अनेक घरे स्वतःच्या नावाने विकत घेतली आहेत ज्यांचे भरभक्कम भाडे त्यांना मिळते.तसेच त्या राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत राज्यसभेच्या सदस्य म्हणून त्यांना पेन्शन सुद्धा मिळते.बिहार सरकारने त्यांना आपला ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे या कामाचे सुद्धा त्यांना मानधन मिळते.

तसेच रियालिटी शो मध्ये जेव्हा रेखा हजेरी लावतात तेव्हा त्याचे काही लाखांनी त्या मानधन घेतात.याव्यतिरिक्त कोणत्याही फॅशन स्टोअर किंवा सौंदर्याशी निगडीत व्यवसायाच्या ओपनिंग साठी रेखा या पहिली पसंती आहेत व या कामाचे सुद्धा त्या फी घेतात.रेखा जी आपल्या काळातील महागड्या अभिनेत्रींपैकी एक मानल्या जात असत व त्या काळी त्यांनी स्वतःसाठी बचत करून खूप सारा पैसा ठेवला आहे कारण लहानपणी त्यांनी गरिबीचे चटके सोसले आहेत.