Home » ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास… 
Celebrities

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास… 

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे आज सकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ ते कलाविश्वात सक्रिय आहेत. रेखा कामत यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.आजच्या तरुणांई मध्ये त्या आजी म्हणून सर्वाना ठाऊक होत्या.त्यांनी कृष्णधवल या चित्रपटामध्ये नायिका म्हणून केलेलय भूमिकेमध्ये खूप गाजलय होत्या.’लाखाची गोष्ट’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

रेखा कामत यांची प्रत्येक भूमिका प्रसिद्ध असून त्यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रेखाचा पहिला चित्रपट 1952 मध्ये प्रदर्शित झालेला लख्ची गोश्त होता.राजा परांजपे, चित्रपटात माडगूळकर आणि सुधीर फाटके होते.रेखाला संजीवनी आणि माधवी या दोन मुली आहेत.’आजी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट

त्यांना दोन भाऊ आणि चार बहिणी होत्या अशी ती सात भावंडे होती.त्या सर्वात मोट्या होत्या.त्यांचे वडील आर्मी स्टोअरमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते.त्यांनी कुंभारवाडा येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर त्या प्लाझा चित्रपट गृहाजवळील मिरांडा या चाळीमध्ये राहत होत्या.त्यांचे पुढील शिक्षण छबिलदासमध्ये झाले.वसंतराव कुलकर्णी गुरू.शाळेत असतानाच त्यांनी नृत्य व गायनाचे धडे शिकायला सुरुवात केली होती.रेखा कामत यांच्या माहेरचे नाव कुमुद सुखटणकर होते. शालेय शिक्षणासोबतच त्यांनी कथ्थक आणि भरतनाट्यमचाही अभ्यास केलाप्रसिद्ध नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले.

गणेशोत्सवात मेळ्यांमध्ये काम केले. ‘रामलीला’ या नृत्यनाटिकेमध्ये काम केल्यानंतर त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.त्यांनी रेखा याचं नावाने मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते आणि पुढे हेच नाव त्यांची ओळख झाल.रेखा कामत यांचे  गाजलेले चित्रपट ‘गृहदेवता’, ‘कुबेराचे धन’,  ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’,’अगंबाई अरेच्चा’.’नेताजी पालकर’ आणि ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटामध्ये त्यांनी लावणी सादर केली होती.

फक्त  चित्रपटच नाही  तर व्यावसायिक मराठी रंगभूमीवर देखील रेखा कामत यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, इत्यादी नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.