Home » बालिका वधू फेम अविका गौर बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
Celebrities Entertainment

बालिका वधू फेम अविका गौर बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

कलर्स वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या बालिका वधू या मालिकेतील अभिनेत्री अविका गौरने  चाहत्यांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामध्ये अविका गौरने आनंदीची भूमिका साकारली आहे. अविका आनंदीच्या या भूमिकेमुळे अगदी घराघरांमध्ये जाऊन पोहोचली. ही  मालिका इतकी लोकप्रिय झाली होती की महिलावर्ग या मालिकेनंतर अविकाला आनंदी या नावाने ओळखू लागला.

या मालिकेद्वारे समाजामध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला गेला. या मालिकेमध्ये आनंदी हिचा विवाह अगदी लहानपणीच लावून दिला जातो ज्यामुळे तिला तिचे शिक्षणही मध्येच सोडून द्यावे लागते व इथूनच या कथेला सुरुवात होते.अविकाने नुकताच आपला चोविसावा वाढदिवस साजरा केला. गेल्या अनेक वर्षांपासून आविका छोट्या पडद्यावर दिसली नाही .मात्र मध्यंतरी काही चित्रपटांमध्ये व सोशल मीडियावर मात्र अविका चे दर्शन होत असते.

बालिका वधू या मालिकेमध्ये सर्वसाधारण गावाकडच्या मुलीची भूमिका साकारणारी अविका प्रत्यक्ष आयुष्यात बोल्ड आणि ब्यूटिफुल आहे हे तिच्या सोशल मीडियावरील छायाचित्रांमधुन स्पष्टपणे दिसून येते. बालिका वधू या मालिकेनंतर अविकाने ससुराल सिमर का या मालिकेत काम केले होते .या मालिकेमध्ये तिने एका पत्नीची भूमिका साकारली होती .चाहत्यांना तिचे हे पात्रही आवडले होते. या दरम्यान तिच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुद्धा रंगली होती.

बीम

तिच्यापेक्षा खूप मोठ्या असलेल्या सहकारी सोबत तिचे नाव रंगले होते मात्र यानंतर तिने हे सर्व नाकारले मात्र अविकाचे आपल्या आयुष्यातील कथित प्रियकरासोबत गुप्तपणे लग्न‌ केले असून ती एका  मुलाची आई असून तिने हे सर्व लपवण्याच्या बातम्या सुद्धा येऊ लागल्या होत्या‌.मात्र अविकाने या सर्व बातम्यांचे खंडन केले व या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.