Home » ‘या’ कारणामुळे झाले होते सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप…
Celebrities

‘या’ कारणामुळे झाले होते सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप…

ऐश्वर्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते. होय,एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्याचे नाव सलमानसोबत जोडले गेले होते आणि दोघेही बरेच दिवस डेट करत होते.या जोडीला बॉलीवूडची सर्वात सुंदर जोडी म्हटले जाते.

पण एका रात्री असे काही घडले की ऐश्वर्या आणि सलमानचे ब्रेकअप झाले.सलमाननंतर ऐश्वर्याचे नाव विवेक ओबेरॉयसोबत जोडले गेले पण हे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. पण त्या रात्री सलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले तेव्हा काय झाले.

१९९९ मध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटासाठी एकत्र शूटिंग करत होते.शोच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.येथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली.ऐश्वर्या लवकरच सलमान खानच्या कुटुंबाच्या जवळ आली.

त्यावेळी सलमानच्या कुटुंबात कोणताही कार्यक्रम असला की ऐश्वर्या तिथे जायची.सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरासोबत ऐश्वर्याचे चांगले संबंध होते,पण ऐश्वर्याचे कुटुंबीय याला विरोध करत होते.असे म्हटले जाते की नोव्हेंबर २००१ मध्ये एके दिवशी दारूच्या नशेत सलमान खान ऐश्वर्याच्या अपार्टमेंटबाहेर पोहोचला आणि दरवाजा ठोठावायला लागला. 

दरम्यान,त्याने जबरदस्तीने आत येण्याचा आग्रह धरला पण ऐश्वर्याने त्याला आत येऊ द्यायचे नव्हते.त्यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्यामुळे ऐश्वर्याने दरवाजा उघडला नाही.त्यावेळी सलमानने आ’त्म’ह’त्ये’ची धमकीही दिली होती आणि हे सर्व पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होते.

ऐश्वर्याने सलमानला अपार्टमेंटमध्ये येण्याची परवानगी दिली.ऐश्वर्याने त्याच वेळी त्याच्याशी लग्न करण्याचे वचन द्यावे,अशी सलमानची इच्छा होती,पण ऐश्वर्याला हा निर्णय घाईघाईने घ्यायचा नव्हता.या प्रकरणावरून दोघांमध्ये मोठे भांडण झाले आणि लवकरच दोघे वेगळे झाले.