Home » रणवीर सिंह मुळे अंबानींचे दोनशे कोटींचे नुकसान,कसे ते जाणून घ्या…
Celebrities

रणवीर सिंह मुळे अंबानींचे दोनशे कोटींचे नुकसान,कसे ते जाणून घ्या…

अंबानी कुटुंब हे भारताप्रमाणेच संपूर्ण जगभरातील श्रीमंत व यशस्वी उद्योजकांपैकी एक मानले जाते.स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली होती.धीरूभाई अंबानी यांच्या पश्चात त्यांची दोन मुले मुकेश अंबानी व अनिल अंबानी हे रिलायन्स उद्योग समूहाचा कारभार सांभाळत आहेत.हे दोघेही भाऊ आता वेगवेगळ्या वाटांनी पुढे जात आहेत. मुकेश अंबानी हे सध्याच्या घडीला सर्वाधिक यशस्वी व श्रीमंत उद्योजक आहेत व नेहमीच चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व आहेत.

अनिल अंबानी हे रिलायन्स एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड चे मालक आहेत.अंबानी कुटुंब हे उद्योग जगतामध्ये अतिशय कर्तबगार व्यक्तिमत्त्व मानले जाते.मात्र मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी यांना एका चित्रपट अभिनेत्यामुळे तब्बल दोनशे कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.हा अभिनेता म्हणजेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह होय.अनिल अंबानी यांना रणविर सिंह मुळे 200 कोटींचे नुकसान कसे होणार आहे हे आपण पाहूया.

रणवीर सिंह याचा नुकताच 83 हा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे.हा चित्रपट 1983 साली माजी क्रिकेट कप्तान कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने सर्वात प्रथम विश्वचषक जिंकण्याच्या घटनेवर आधारित आहे.हा चित्रपट बनवण्यासाठी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ने तब्बल दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.कारण त्यांना भारतीयांच्या दृष्टीने इतकी अभिमानाची गोष्ट असलेल्या घटनेवर आधारित चित्रपट हा नक्कीच सुपर हिट होणार याची खात्री होती.

हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला व या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळू शकले नाही.आत्तापर्यंत या चित्रपटाने 60 ते 70 कोटी रुपये इतका गल्ला जमवला आहे.प्रत्यक्षात अनिल अंबानी यांनी या चित्रपटासाठी दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.या चित्रपटाला फ्लॉपचाचा शिक्का बसू शकतो असे सुद्धा भाकीत वर्तवले जात आहे कारण ओमायक्रोन व कोरोनाच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा भारतामधील काही चित्रपटगृहे बंद होताना दिसत आहेत.याचा फटका या चित्रपटाला बसू शकतो.

83 हा चित्रपट एक महत्वकांक्षी प्रकल्प होता कारण या चित्रपटामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रमाणे रणवीर सिंह सुद्धा या चित्रपटाच्या नफ्यातून मिळणारे काही टक्के स्वतःला घेणार होता.या चित्रपटाच्या अपयशी होण्यामागे अनेक कारणे दिली जातात.त्यापैकी एक कारण म्हणजे सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपट पुष्पा हा धुमाकूळ घालत असून प्रेक्षकांनी यामुळे 83 कडे पाठ फिरवली आहे.दीपिका पदुकोण ही सुद्धा या चित्रपटाच्या अपयश मागचे एक मुख्य कारण सांगितले जाते.कारण काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोनने जेएनयू आंदोलनामध्ये आपला पाठिंबा दर्शवला होता व सुशांत सिंह राजपूत केस नंतर ड्र’ग्स प्रकरणांमध्ये दिपीकाचे हे नाव समोर आले होते व तिची चौकशी सुद्धा करण्यात आली होती.

About the author

Being Maharashtrian

Add Comment

Click here to post a comment