Home » बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे ‘८’ नंबरचा फायदा आहे अत्यंत उपयुक्त…
Food & Drinks Health

बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे ‘८’ नंबरचा फायदा आहे अत्यंत उपयुक्त…

भारत हा खवय्यांचा देश आहे.जेवणानंतर बडीशेप खाण्याप्रतीचे भारतीयांचे प्रेम हे सर्वश्रुत आहे.भारतीय लोक प्रत्येक खाण्यानंतर पचन आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बडीशोप खातात.मात्र या बडीशेप चे फायदे केवळ जेवणाचे पचन होण्यासाठी किंवा आनंदासाठी नसून याचे अनेक औषधी फायदे व स्वयंपाकामध्ये सुद्धा अनेक उपयोग आहेत.बडीशेप मध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व,क्षार,कॅल्शिअम,मॅग्नेशिअम,झिंक यांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश असतो.यामुळे बडीशेप खाण्याचे आपल्या शरीरास खूप फायदे आहेत व यामुळे पोषण सुद्धा मिळते.आज आपण बडीशोप खाण्यामुळे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

१) बडीशेप मध्ये मूलतः एक प्रकारचे सुगंधी तेल असते ज्यामुळे आपल्या श्वासाला येणारा दुर्गंध कमी होतो व यामध्ये असणाऱ्या एंटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे श्वासाला दुर्गंधी येत नाही.बडीशेप मध्ये लाळ उत्पन्न करण्याच्या गुणधर्मामुळे श्वासाला दुर्गंधी आणणाऱ्या बॅक्टेरिया यांचा नाश होतो.

२) बडीशेप चा सर्वात मोठा फायदा म्हणजे पचनासाठी उपयुक्त असणे होय.बडीशेप मध्ये फायबर आणि अन्य संप्रेरके असतात ज्यामुळे आपल्या पचनाला चालना मिळते. बडीशेप आकाराने लहान असली तरीही त्यामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात. बडीशेप खाण्यामुळे अपचन बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. बडीशेप चावून खाणे व्यतिरिक्त बडीशेप पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी पिले असता सुद्धा फायदा मिळतो.

३) बडीशेप खाण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बडीशेप मध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.यामुळे रक्तप्रवाहातील सुरळीत पणा राहतो तसेच बडीशेप मुळे लाळेतील नायट्राइटचे प्रमाण योग्य प्रमाणात राहून रक्तदाबाच्या समस्यांपासून बचाव होतो.

४) बडीशेप मध्ये असलेल्या फायटो न्युट्रिएन्टस मुळे सर्दी व अन्य श्वसनाशी निगडित आजारांपासून बचाव होतो. नाक चोंदणे किंवा सर्दी होणे यांसारख्या समस्या पासूनही आराम मिळतो.

५) बडिशेप मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेलेनियम ,झिंक आणि पोटॅशियम असते. यामुळे रक्त प्रवाह हा शुद्ध राखला जातो.परिणामी आपल्या शरीरातील रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ही मुबलक राहते. याचा परिणाम हा चांगल्या त्वचेवर होतो. तारुण्यपिटिका, पुरळ यांसारख्या त्वचेच्या समस्या पासून बचाव होतो.

६) बडीशेप मध्ये असलेले उपयुक्त तेल आणि तंतू जन्य पदार्थ यांमुळे रक्त शुद्ध राहण्यास मदत होते.बडिशेप सेवनामुळे शरीरातीमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

७) बडीशेप मध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म असल्याचे हे काही संशोधनामध्ये आढळून आले आहे.बडीशोप मध्ये ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करणे आणि शरीरामध्ये मुक्तपणे संचार करणार्‍या कणांच्या निर्मितीस प्रादुर्भाव करणे हे गुणधर्म असतात व यामुळेच कॅन्सरपासून बचाव होतो असा निष्कर्ष काढला जातो.

८) बडीशेप खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यासही काही प्रमाणात सहाय्य होते.कारण यामुळे चयापचयाची प्रक्रिया वेगाने घडून येते.जेवणानंतर बडीशेपचे नित्यनेमाने सेवन केले असता पचन प्रक्रिया सुधारते.बडीशेप चे पाणी पिल्याने सुद्धा वजन कमी होण्यास सहाय्य मिळते.बडीशेप सेवन केल्यामुळे तंतुजन्य पदार्थ शरीरात जाऊन दीर्घकाळपर्यंत भूक न लागण्याची प्रक्रियासुद्धा घडते.

९) बडीशेप च्या सेवनामुळे पचन प्रक्रियेस चालना मिळते. यामुळे शक्यतो गॅस सारख्या समस्या निर्माण होत नाही.बडीशेप मध्ये असलेल्या एंटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे हे सहज शक्य होते.बडीशेप मध्ये अनेक विटामिन्स असतात.या पैकी डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व अ हे विटामिन सुद्धा बडिशेपमध्ये मोठ्या प्रमाणात असते.यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

१०) ज्या व्यक्तींना ॲसिडिटीची समस्या असते त्यांनी बडीशेपचे सेवन नियमित पणे करावे यामुळे निश्चितच आराम मिळतो. तसेच बडीशेप मध्ये शरीराला थंडावा देण्याचाही गुणधर्म असतो. यामुळे जर तुमच्या हातापायांची जळजळ होत असेल तर पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यावे यामुळे पाच ते सहा दिवसांमध्ये आराम मिळतो.खोकला,घसादुखी यांसारख्या समस्यांवरही बडीशेप व खडीसाखर मिसळून खाणे हा उपाय अतिशय रामबाण मानला जातो.