Home » कानातील मळ सहजपणे काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील अत्यंत प्रभावशाली…
Health

कानातील मळ सहजपणे काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील अत्यंत प्रभावशाली…

निरोगी आरोग्यासाठी शरीर स्वच्छ ठेवणे खूप आवश्‍यक असते.शरीराच्या इतर अंगा बरोबरच कानाची सफाई नित्यनेमाने करणे खूप आवश्यक असते.कान हा आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील असा अवयव आहे.धूळ, प्रदूषण किंवा आंघोळीच्या वेळी कानांमध्ये पाणी गेले असता कानाला इजा पोहोचते.धूळ,प्रदूषण किंवा कानामध्ये पाणी गेले असता कानामध्ये मळ साठतो व यामुळे आपल्याला ऐकू कमी येते किंवा कानामध्ये वेदना होतात.या सर्व त्रासांपासून बचाव होण्यासाठी कानाची दैनंदिन तत्वावर सफाई केली गेली पाहिजे.कानाची सफाई करण्यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय आपण अवलंबू शकतो.कानाची स्वच्छता राखण्यासाठी केले जाऊ शकणारे काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

१) बदाम तेल : बदाम किंवा सरसों तेलाचा वापर करून अतिशय सहजपणे कानातील मळ काढला जाऊ शकतो.यासाठी सरसोचे तेल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करावा‌.सरसोचे तेल कानातील मळ काढण्यासाठी जास्त प्रभावशाली ठरते.

२) मिठाचे पाणी : मिठाचे पाणी वापरून कानामधील मळ अगदी सहजगत्या काढता येणे शक्य असते.मिठाच्या पाण्यामुळे कानामधील मळ मऊ होतो व तो सहजपणे काढला जाऊ शकतो.यासाठी एक चमचा मीठ अर्धा कप पाण्यामध्ये हे पाणी गरम करून मिसळावे.मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे व यानंतर हे मिठाचे पाणी कापसाच्या बोळ्याला बुडवून कानामध्ये पिळावे व साधारण तीन ते पाच मिनिटे त्याच स्थितीमध्ये रहावे. हीच कृती दुसऱ्या कानाच्या बाबतही करावी व यानंतर कापसा द्वारे कानाच्या बाहेर आलेला मऊ झालेला मळ काढून घ्यावा.

३) ऑलिव्ह ऑइल : ऑलिव ऑइल हे अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त तेल आहे.ऑलिव ऑइल मुळे कानांचे कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्यापासून संरक्षण होते आणि कानामध्ये पाणी गेले असता ते शोषून घेण्याचे गुणधर्मही यामध्ये असतात.ऑलिव ऑइल मुळे कानामधील मळ अगदी सहजपणे बाहेर काढता येऊ शकतो आणि ऑलिव ऑइल मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे संसर्ग होण्यापासून ही संरक्षण मिळते.ऑलिव ऑइल थोडेसे कोमट करून घ्यावे व ड्रोपरच्या सहाय्याने कानांमध्ये तीन ते चार थेंब टाकावेत व या स्थितीमध्ये साधारण दहा मिनिटे राहावे जेणेकरून तेल मळामध्ये शोषले जाऊन तो टणक मळ मऊ होण्यास मदत मिळेल.कानां मधील नाजूक अवयवांना ही या ऑईल मुळे वंगण मिळते.

४) हायड्रोजन पेरॉक्साइड : हायड्रोजन पेरॉक्साइड हे कानामधील मळ काढण्यासाठी वापरले जाणारा खूप जुना उपाय आहे. हायड्रोजन पेरॉक्साइड आणि पाणी समप्रमाणात एकमेकांमध्ये मिसळून हे मिश्रण ड्रोपर च्या साह्याने काना मध्ये तीन ते चार थेंब टाकावे त्यामुळे कानामधील मळ बाहेर येण्यास साहाय्य मिळते.

५) कोमट पाणी : कोमट पाण्याचा वापर करून सुद्धा कानातील  मळ काढला जाऊ शकतो.मात्र यासाठी आवश्यक ती खबरदारी व योग्य मार्गदर्शनाखाली हा उपाय करणे गरजेचे ठरते.कानामध्ये कोमट पाणी घालताना हे पाणी नेहमी स्वच्छ आणि फील्टर्ड असावे‌.कानामध्ये पाणी घालताना सिरींजचा वापर करावा व या सीरिंजमध्ये पाणी भरल्यानंतर काही थेंब हे बाहेरच सोडून मग ते पाणी कानामध्ये घ्यावे यामुळे अतिरिक्त दबाव कानावर येत नाही. हा उपाय करण्याअगोदर योग्य ते मार्गदर्शन करून घ्यावे अन्यथा यामुळे विनाकारण अन्य संसर्ग होऊ शकतात.

६) कांद्याचा रस : कांद्याच्या रसाने सुद्धा कानातील मळ सहजपणे काढता येतो.कांद्याला थोडे वाफवून घेऊन मग त्याचा रस काढता येऊ शकतो किंवा कच्च्या कांद्याचा ही रस काढला जाऊ शकतो.कांद्याचा रस काना मध्ये टाकून कानातील मळ सहजपणे काढला जाऊ शकतो.

(Disclaimer : ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या वरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती हि प्राथमिक स्वरूपाची असून ती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय होऊ शकत नाही. यातील कोणताही उपचार किंवा सल्ला अमलात आणण्यापूर्वी सदरील विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याविषयी बीइंग महाराष्ट्रीयन पोर्टल कोणताही दावा करत नसून कसलीही जबाबदारी घेत नाही)