Home » कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी करा ‘या’ पेयांचे सेवन…
Health

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी करा ‘या’ पेयांचे सेवन…

पूर्ण जगभरामध्ये कोरोना चा वाढता प्रसार बघता या गोष्टीची काळजी लागून राहिली आहे की या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी किंवा आजार झाला तर काय उपाय योजना करावी.आत्तापर्यंतच्या या आजारा संदर्भातील संशोधनातून डॉक्टर व आरोग्य तज्ञांच्या मते या आजाराशी लढण्यासाठी एकच उपाय केला जाऊ शकतो व तो म्हणजे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे होय.

रोगप्रतिकारक्षमता वाढवली तर सहजपणे या आजाराला बळी पडू शकत नाही.जर या आजाराचा प्रादुर्भाव झाला तर त्यामधून तुम्ही लवकर बरे होऊ शकता.चांगली रोगप्रतिकारक क्षमता असण्यासाठी आपण आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा आहार जाऊ देतो यावर सर्व काही अवलंबून असते.असे अनेक पदार्थ असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते‌.अनेक व्यक्तींना हे पदार्थ खाणे फारसे आवडत नाही अशा वेळी काही पेय आहे ज्यांच्या सेवनामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकते.अशाच काही रोगप्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या पेयांविषयी जाणून घेणार आहोत.

१) टर्मरिक टी- टर्मरिक टी बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य म्हणजे ओली हळद किंवा हळदीची पावडर ,पाणी व थोडेसे आले या सर्व मिश्रणाला एकत्र करून तीन ते चार कप पाण्यामध्ये चांगले उकळून घेऊन गाळून हे मिश्रण प्यावे. ओली हळद असेल तर तिला किसुन घ्यावे .तिचा मुख्य फायदा म्हणजे यामध्ये हळदीत असलेले कर्क्युमिन हे घटक व या घटकांमुळे शरीरातील कोणत्याही त्रासाला व वेदनेला दूर करता येते.तसेच शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता ही वाढवता येते.

२) मसाल्याचा चहा -मसाल्याचा चहा बनवण्यासाठी लवंग, दालचिनी ,तेजपत्ता ,आले व तुळशीची काही पाने इत्यादी साहित्य साधारण एक लिटर पाण्यामध्ये एकत्र करून तीस मिनिटे उकळून घ्यावे. या पाण्यामध्ये नंतर गाळून घेऊन थोडासा मध मिसळावा व हे पाणी प्यावे .या मिश्रणामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीमायक्रोबियल व एंटी बॅक्टेरियल तत्व असतात ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव केला जातो.

३) एप्पल साइडर विनेगर -एपल साइडला विनेगर व आले हे आले एकत्र करून हे मिश्रण मिसळावे. या  मिश्रणामध्ये सर्दी व सायनस पासून वाचण्याचे गुणधर्म असतात. मधामध्ये असलेल्या एंटी बॅक्टेरियल व एंटी मायक्रोबियल गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

४) हिरव्या भाज्यांचा ज्यूस- हिरव्या भाज्यांचा  ज्यूस बनवण्यासाठी कोथींबीरीच्या काड्या, पालक ची पाने ,काकडी, लिंबू इत्यादी एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे व त्यामध्ये थोडे पाणी मिसळावे. या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व अ व जीवनसत्त्व क आणि फॉलिक ऍसिड असते.

५) मिल्क शेक- हा मिल्क शेक बनवण्यासाठी साखर नसलेले बदामाचे दूध ,नारळाचे दूध, हळद इत्यादी घटक एकत्र करून गॅसवर गरम करावे. हे मिश्रण उकळू देऊ नये. हे मिश्रण गॅसवरून काढल्यानंतर यामध्ये मध मिसळावा. नारळ आणि बदामामुळे शरीरामध्ये एंटी अक्सिडेंट मोठ्या प्रमाणात निर्माण होतात व हळदीमुळे संसर्ग होत नाही.

६) हॉट लेमोनेड- हॉट लेमोनेड बनवण्यासाठी 4 ते 5लसणाच्या पाकळ्या, दालचिनीचा तुकडा, लिंबू, आल्याचा तुकडा घेऊन हे मिश्रण चांगले उकळून घ्यावे व त्यानंतर यामध्ये मध मिसळावा.दालचिनीमध्ये असलेल्या मायक्रोबियल गुणधर्मांमुळे शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते व हळदीमुळे संसर्गजन्य आजारांपासून रक्षण होते.

७) पुदिना -पुदिना हा अनेक आजारांपासून संरक्षण देणारा हमखास उपाय आहे .याची पाने व लिंबू टाकून बनवलेले चहाचे सेवन केल्यास सर्दी-खोकला इत्यादींपासून संरक्षण मिळते. तसेच त्यामधील गुणधर्मामुळे शरीराचा होणारा दाह कमी होतो व सूज कमी होते .पचनाची कार्यक्षमताही वाढते.

८) ग्रीन टी आणि काळी मिरी- काळी मिरी व ग्रीन टी यांच्या सेवनामुळे केवळ शरीराला पोषण मिळत नाही तर सर्दी ,खोकला ,डोकेदुखी पोट दुखी यावर हा चहा उपयुक्त ठरतो.

९) तुलसी टी- तुळस ही खूपच औषधी वनस्पती आहे.प्राचीन काळापासून तुळशीचे धार्मिक कार्यामध्ये सुद्धा पूजन केले जाते व तुळशीचे औषधी गुणधर्मांमुळे घरामध्ये तुळशीचे चे रोप ठेवावे असे सांगितले. तुळशीच्या पानांचा काढा पिल्यामुळे सर्दी खोकला रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते.