Home » ‘गोदी मीडिया’ या शब्दाची सुरुवात आणि इतिहास जाणून घ्या…
Infomatic

‘गोदी मीडिया’ या शब्दाची सुरुवात आणि इतिहास जाणून घ्या…

पत्रकारिता किंवा प्रसार माध्यमे यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने निष्पक्षपाती पणे व तटस्थपणे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक व राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणे अभिप्रेत असते.स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पत्रकारितेने समाज मनामध्ये सरकारविरोधी चीड निर्माण करणे व राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करणे यासाठी आमूलाग्र असे योगदान दिले आहे.स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पत्रकारितेमध्ये व प्रसारमाध्यमांच्या एकंदरीतच रूपामध्ये अनेक बदल घडून आले.यामधून पत्रकारिता क्षेत्रातील विचारधारा सुद्धा बदलत गेल्या.पत्रकारितेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा बदलत गेला.

याला कारण म्हणजे प्रसारमाध्यमांनी आपल्या अजेंड्यावर घेतलेले विषय होय.यातूनच प्रसार माध्यमे व पत्रकारितेच्या निष्पक्षपाती पणावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.हे प्रश्नचिन्ह अजूनच अधोरेखित केले जाते जेव्हा भारतीय प्रसारमाध्यमांचा उल्लेख ‘गोदी मीडिया’ असा केला जातो.सध्या अगदी शब्दकोषाध्ये नोंद असल्याप्रमाणे ‘गोदी मीडिया’ हा शब्द प्रमाण म्हणूनच जणूकाही वापरला जात आहे.मुळात गोदी मीडिया या शब्दाचा अर्थ काय व या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली हे आज आपण जाणून घेणार आहोत.

‘गोदी मीडिया’ हा शब्द प्रचार सर्वात प्रथम एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी उच्चारला होता.’गोदी मीडिया’ याचा अर्थ सध्याच्या केंद्रांमध्ये असलेल्या मोदी सरकारच्या केवळ हितामध्ये असलेल्या बातम्या देणारी प्रसारमाध्यमे असा अभिप्रेत आहे.मोदी सरकारचे हितसंबंधांना जपणारी मीडिया म्हणजे ‘गोदी मीडिया’ अशी भावना त्यामागे आहे.गेल्या दशकभरापासून प्रसार माध्यमांमध्ये राजकीय हितसंबंधांनी प्रेरित पत्रकारिता करण्याचा ट्रेन्ड वाढत चालला आहे.

कोणतीही सामाजिक,धार्मिक किंवा सांस्कृतिक घटना ही राजकीय हेतूने कशी प्रेरित आहे हे प्रसारमाध्यमांद्वारे समाजात बिंबवले जाते व यातून अनेकदा तेढ निर्माण होते.जेव्हा पासून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत तेव्हापासून गोदी मीडिया सारखा ट्रेंड वाढत चालला आहे.या मानसिकते द्वारे प्रसारमाध्यमे समाजमनावर केवळ कशाप्रकारे त्यांचे अच्छे दिन आले आहेत हे ठसवण्यासाठी कोणत्याही घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात किंवा एकांगी बातम्या देतात.रविश कुमार यांनी जणूकाही मोदी या पत्रकारांना आपल्या मांडीवर म्हणजेच गोदीमध्ये घेऊन बसले आहेत अशाप्रकारे हे वार्तांकन करतात असे म्हटले आहे.

विशिष्ट प्रकारचा अजेंडा गोदी मीडिया द्वारे समाजामध्ये पसरवला जातो.यामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून कसे योग्य आहेत हे एकांगी पणे दाखवणा-या घटनांचे वार्तांकन विशेष करून केले जाते.जेव्हा केंद्र सरकारच्या विरोधात एखादे आंदोलन केले जाते तेव्हा हे आंदोलन सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात असल्याचे न दाखवता हे आंदोलन देशविघातक असल्याचे भासवले जाते.

तसेच ज्या राज्यांमध्ये भाजपप्रणित सरकार नाही तेथे असुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश दिले जातात.हे कार्यक्रम विशेष करून प्राईम टाईमला दाखवले जातात.रविश कुमार यांनी सर्वात प्रथम ‘गोदी मीडिया’ हा शब्द उच्चारला व नंतर एनडीटीव्ही तील अन्य पत्रकारांनी सुद्धा या शब्दाचा उच्चार वेळोवेळी केला आहे.कोणत्याही एका पक्षाला किंवा व्यक्तीला न पुजता समाजाच्या व राष्ट्राच्या हितसंबंधांना समोर ठेवून खरे प्रश्न मीडियाने समोर आणणे खूप आवश्यक आहे हेच गोदी मिडीयासारख्या शब्द उच्चार यांच्या उत्पत्ती मधून आपल्या निदर्शनास येते.