Home » सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर भडकली सोनम कपूर म्हणाली ‘अडाणी आणि अशिक्षित’…
News

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर भडकली सोनम कपूर म्हणाली ‘अडाणी आणि अशिक्षित’…

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर सामाजिक-राजकीय मुद्द्यांवरच्या तिच्या मतामुळेही चर्चेत असते.भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर तिने नुकतीच जोरदार टीका केली आहे.खरे तर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत LGBTQIA समुदायासाठी आक्षेपार्ह विधान केले होते.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ अंतर्गत प्रस्तावित दुरुस्ती विधेयकाविरोधात ते बोलत होते. युनिव्हर्सिटी बोर्डात एलजीबीटीक्यू+ समुदायाचा समावेश करण्याला त्यांनी विरोध केला,”तुम्ही लेस्बियन आणि गे यांना सदस्य म्हणून नियुक्त करणार आहात का? याबाबतीत आणखी कोणतीही वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे का? 

यावरच थांबले नाही तर,मुनगंटीवार यांनी अलैंगिक संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की,जर एखाद्या व्यक्तीचे एखाद्या प्राण्याशी अलैंगिक संबंध असतील तर तो प्राणी येऊन त्याचे अलैंगिक संबंध असल्याचे सिद्ध होईल का? शेवटी काय चाललंय?”

आमदाराचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.अभिनेत्री सोनम कपूरनेही मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला.Yes, We Exist India ची तपशीलवार पोस्ट शेअर करत सोनमने लिहिले, “अज्ञानी, अशिक्षित…”

याशिवाय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही मुनगंटीवार यांच्या आक्षेपांना उत्तर दिले.ते म्हणाले, “समान संधींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवाडे आले आहेत. सदस्य (मुनगंटीवार) हा मुद्दा मांडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत… आम्ही जे करत आहोत त्यात नवीन काही नाही,देशाच्या इतर भागातही असेच कायदे २०१५ मध्ये करण्यात आले आहेत.आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच दुरुस्ती विधेयक आणले आहे.