Home » चाळीतील खोलीपासून ते आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती बनण्याचा गौतम अदानी यांचा प्रवास…
Success

चाळीतील खोलीपासून ते आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती बनण्याचा गौतम अदानी यांचा प्रवास…

अशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये उद्योजक मुकेश अंबानी यानंतर नाव येते ते गौतम अदानी यांचे. गौतम अदाणी हे अदाणी उद्योग समूहाचे चेअरमन आहेत.गौतम अदानी यांना या क्रमांकावर पोहोचणे हे निश्चितच सोपे नव्हते.या स्थानावर पोहोचण्यासाठी गौतम अदानी यांनी प्रचंड संघर्ष केला आहे व आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये अनेक चढ-उताराचा सामना सुद्धा केला आहे.सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये चीनच्या झोंग शैनशैन यांना मागे टाकत गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

तर संपूर्ण जगभरातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी मध्ये ते चौदाव्या क्रमांकावर आहेत.अदानी उद्योग समुहाच्या सहा कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे मार्केट कॅप हे एक लाख करोड च्या वर आहे या मुळे अदानी उद्योग समुह हा भारतातील तिसरा असा उद्योग समूह बनला आहे ज्याचे मार्केट कॅप 100 कोटीच्या वर आहे.टाटा उद्योग समूहाने सुद्धा हा बहुमान मिळवला होता.अदानी ग्रुप खाणकाम,जहाज बांधणी,संरक्षण व सैन्यादल माहिती व संसाधन यासह अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा विस्तार वाढवलेला उद्योग समूह आहे.

गौतम अदानी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी अहमदाबाद येथे झाला. गौतम अदानी यांना अन्य सहा भावंडे होती.आपल्या सहा भावंडे व आई-वडिलांसह गौतम अदानी सुरुवातीच्या काळामध्ये एका चाळीमध्ये राहत असत. गुजरात युनिव्हर्सिटी मधून गौतम अदानी हे शिक्षण घेत होते मात्र आपले बी कॉम चे शिक्षण पूर्ण न करताच त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईची वाट धरली.मुंबईमध्ये आल्यावर त्यांनी सुरुवातीला डायमंड सोर्टर म्हणून काम सुरू केले व काही वर्षांमध्येच मुंबई येथील झवेरी बाजारामध्ये स्वतःची डायमंड ब्रोकरेज फर्म सुरू केली.

या व्यवसायामध्ये जम बसत असतानाच त्यांनी काही वर्षानंतर आपल्या भावाच्या प्लास्टिकच्या उद्योगांमध्ये मदत करण्यासाठी पुन्हा एकदा अहमदाबाद कडे कूच केले.या ठिकाणी त्यांनी पीवीसीच्या निर्यातीचे काम सुरू केले व अशा प्रकारे त्यांनी जागतिक व्यापारामध्ये आपले पाऊल ठेवले.1988 साली अदाणी पॉवर अंड अग्री कमोडिटी ची स्थापना करण्यात आली.गौतम अदानी यांनी सुरू केलेल्या पीव्हीसी च्या निर्यातीला चांगला प्रतिसाद मिळाला.

1991 साली भारतामध्ये आलेल्या आर्थिक सुधारणांमुळे अदानी उद्योग समूहाचे अजून विस्तारीकरण झाले व गौतम अदानी हे संपूर्ण देशभरातील उद्योग जगतातील परिचित नाव बनले.1995 साल हे अदानी उद्योग समुहा साठी खूपच यशस्वी ठरले कारण याच वर्षी अदानी उद्योग समूहाला मुंद्रा बंदर किंवा पोर्ट च्या संचालन करण्याची जबाबदारी मिळाली.अदानी उद्योग समूहाने विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कक्षा रुंदावण्या चा क्रम चालू ठेवला व यातूनच त्यांनी वीज निर्मिती,खानकाम,कोळसा खाणी,या उद्योगांमध्ये आपल्या उद्योगसमूहाचा विस्तार केला.

कोल मायनिंग मध्ये अदानी उद्योग समुह सध्याचा आघाडीचा उद्योग असून कार्यक्षमतेच्या बाबतीतही हा उद्योग समूह सूचीमध्ये आघाडीवर आहे.आपल्या उद्योगसमूहांना अधिकाधिक पुढे आणण्याची महत्वकांशा बाळगणारे गौतम अदानी हे नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत असतात व यातूनच आता अदानी उद्योग समूह रोड कन्स्ट्रक्शन,पोर्ट कन्स्ट्रक्शन,डिफेन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रामध्ये आपले कौशल्य अजमावत आहे.