Home » नऊशे रुपयांची नोकरी ते टेलिव्हिजनवरील अभिनेत्री असा होता साक्षी तंवरचा प्रवास…
Success

नऊशे रुपयांची नोकरी ते टेलिव्हिजनवरील अभिनेत्री असा होता साक्षी तंवरचा प्रवास…

बडे अच्छे लागते है आणि कहानी घर घर की या मालिकेमध्ये काम केलेली अभिनेत्री साक्षी तन्वर हा सर्वांना परिचित चेहरा आहे. साक्षी तंवर ने साकारलेल्या प्रत्येक भुमिकेने चाहत्यांना प्रभावित केले आहे.साक्षीने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.बडे अच्छे लगते है आणि कहानी घर घर की या मालिकांच्या यशानंतर प्रेक्षकांनी तिच्या अभिनय प्रतिभेला चांगलेच ओळखले.केवळ टेलिव्हिजन वरील मालिकाच नव्हे तर चित्रपटांमध्ये सुद्धा साक्षीने दमदार अभिनय केला आहे.दंगल या चित्रपटामध्ये गीता आणि बबिता फोगट  यांच्या आईची भूमिका साक्षीने खूपच उत्कृष्टपणे साकारली आहे.

साक्षीने दिल्लीमध्ये आपली पहिला नोकरी केली होती. ही नोकरी एका सेल्स ट्रेनीची होती.या नोकरीमध्ये साक्षीला 900 रुपये महिना इतका पगार मिळाला होता.साक्षीने सांगितले की ही ट्रेनी ची नोकरी म्हणजे तिच्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्या मधील नोकरीचा अनुभव होता.तिने लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी चे शिक्षण घेतले आहे‌.आपल्या पहिल्या पगारा मधून तिने स्वतःसाठी एक साडी खरेदी केली होती.साक्षीला साड्यांची खूप आवड आहे व म्हणूनच तिला अनेकदा साडी या पेहरावात पाहिलेले आढळून येते.

साक्षीला शालेय जीवनामध्ये गणित या विषयामध्ये विशेष रुची होती व यामुळे तिला अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा होता.त्या दृष्टीने तिने तयारी सुद्धा केली होती.मात्र प्रवेश परीक्षेमध्ये आवश्यक ते गुण प्राप्त न झाल्यामुळे तिला ही वाट सोडून द्यावी लागली.यानंतर तिने आपले शिक्षण पूर्ण केले व अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.अभिनय क्षेत्रात येण्यासाठी साक्षी दिल्लीहून मुंबईला आली.तिने याठिकाणी भूमिका मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला. सुरुवातीला काही छोट्या-मोठ्या भूमिका तिच्या वाट्याला आल्या मात्र एकता कपूरच्या कहानी घर घर की या मालिकेमधून तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.

या मालिकेमध्ये तिने पार्वती भाभीची भूमिका अतिशय समरसून केली होती व यामुळे ती एकता कपूरची लाडकी बनली.बडे अच्छे लगते है या मालिकेतही तिने खूप उत्कृष्ट काम केले.या मालिकेमध्ये तिच्यासोबत राम कपूर प्रमुख भूमिके मध्ये होता.या मालिकेमध्ये तिने प्रियाची भूमिका साकारली होती.सध्याच्या काळात ट्रेंडमध्ये असलेल्या वेबसीरीज मध्ये सुद्धा नुकतीच साक्षी दिसून आली.कर ले तू भी मोहब्बत या वेब सिरीज मध्ये साक्षीने काम केले आहे या वेबसिरिज मध्ये सुद्धा तिच्या सोबत राम कपूर प्रमुख भूमिकेत होता.