Home » ‘बस कंडक्टर ते सुपरस्टार’ रजनीकांत यांचा प्रेरणादायी प्रवास…
Success

‘बस कंडक्टर ते सुपरस्टार’ रजनीकांत यांचा प्रेरणादायी प्रवास…

भारतामध्ये अनेक महान कलाकार होऊन गेले आहेत यांपैकी काही मोजक्या कलाकारांना लिजेंड म्हटले जाते.यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत होय.हवेत सिगरेट फेकून देऊन अगदी अचूकपणे झेलण्याचा अंदाज असो की हवेत नाणे भिरकावून ते  झेलण्याची एक आगळीवेगळी स्टाईल असो किंवा हसण्याची एक वेगळीच  लकब असो रजनीकांत यांनी आपल्या प्रत्येक अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.रजनीकांत यांनी नुकताच आपला 71वा  वाढदिवस साजरा केला आहे.सिनेमाच्या पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातही प्रत्येक भूमिका अगदी समरसून जगणारे रजनीकांत यांच्या आयुष्याची कहाणी सुद्धा खूपच रंजक आणि संघर्षाने भरलेली आहे. मात्र रजनीकांत यांची हिंमत आणि जिगर  इतके मोठे होते की त्यांनी आपल्या स्वतःच्या बळावर यशाची शिखरं अगदी एकामागोमाग एक सर केली.

रजनीकांत यांनी बॅग उचलणाऱ्या हमालापासून ते फर्निचर बनवण्याच्या कामापासून ते कंडक्टर बनून तिकीट कापण्याचे काम करणाऱ्या सामान्य माणसापासून ते एक सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा रजनीकांत यांचा प्रवास खूपच रंजक आहे...

दक्षिण भारतामध्ये रजनीकांत यांना अक्षरशः देवाप्रमाणे पुजले जाते.त्यांची अनेक ठिकाणी मंदिरे सुद्धा बांधली गेली आहेत.इतक्या उच्च स्थानावर सध्या विराजमान असलेल्या रजनीकांत यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला.रजनीकांत यांचे वडील पोलिस कॉन्स्टेबल होते तर त्यांची आई गृहिणी होती.त्यांचे आयुष्य साधारण कुटुंबाप्रमाणे चालू होते.अशातच अचानक रजनीकांत यांच्या आईचे अचानक निधन झाले. त्यावेळी रजनीकांत यांचे वय अवघे पाच वर्षांचे होते.इथून त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली.त्यांच्या  घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा खालावत चालली होती.यामुळे त्यांनी थोडे मोठे झाल्यावर ओझे उचलण्याचे हमालीचे काम स्वीकारले.हमालीच्या कामातूनही फारसा पैसा मिळत नव्हता त्यावेळी फर्निचर बनवणा-यांच्या हाताखाली त्यांनी काम सुरू केले.

फर्निचर बनवण्याच्या कामा मधूनही रजनीकांत यांना हवे तसे पैसे मिळत नव्हते.अशातच त्यांना बेंगलोर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मध्ये बस कंडक्टर ची नोकरी मिळाली.बस कंडक्टर च्या नोकरी मध्ये त्यांना थोडीफार जास्त कमाई होत असे.मात्र असे म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीमध्ये जर कला असेल तर ती कधी ना कधी समोर येते.त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये अभिनयाचा गुण मुळातच होता व त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका करायला सुरुवात केली.यावेळी त्यांना असे वाटले नव्हते की त्यांच्या अभिनयाच्या कौशल्यावर ते इतक्या पुढपर्यंत जातील.रजनीकांत अभिनय हा केवळ आवडीपोटी करत होते मात्र यामधून त्यांना कमाई सुद्धा होत होती.

अभिनयामध्ये रजनीकांत खूप रमत होते मात्र त्यांच्या कुटुंबियांना मात्र त्यांची अभिनय प्रतीची आवड फारशी रुचत नव्हती. घरातल्यांना रजनीकांत यांनी अभिनयाच्या नादी न लागता एक आर्थिक स्थैर्य देणारी नोकरी करावी असे वाटत होते. त्यांच्यामते अभिनय क्षेत्र हे एक लॉटरी प्रमाणे असते ज्यामध्ये कधीही नुकसान होऊ शकते .म्हणूनच रजनीकांत उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नोकरीला खूप गांभीर्याने घेत असत.

आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास अगदी मनापासून घेतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळवून देण्यासाठी संपूर्ण अवकाश एकत्र येते असे म्हटले जाते अगदी तसेच काहीसे रजनीकांत यांच्या बाबतीत झाले.कंडक्टर घ्या नोकरी मध्ये आयुष्याचे सार्थक मानत असलेल्या रजनीकांत यांना त्यांच्या मित्र राजबहादूर  याने कंडक्टरचा नोकरीपेक्षा आपल्या अभिनयाच्या जिद्दीला जगण्याचा सल्ला दिला.राजबहादूरचा सल्ला मानून त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला व इथूनच त्यांच्या अभिनयाच्या स्वप्नाला पंख मिळाले.तमिळ दिगदर्शक भालचंद्र यांनी रजनीकांत यांच्या मधील अभिनय गुण हेरले व त्यांना चित्रपटाची ऑफर दिली.रजनीकांत यांचा पहिला चित्रपट अपूर्व नागरगाल होता.रजनीकांत यांना एका मागोमाग एक चित्रपट मिळू लागले व 1980 सालापर्यंत रजनीकांत सुपरस्टार बनले होते.

रजनीकांत लोकांच्या गळ्यातला ताईत बनले होते.त्यांचे चित्रपट चांगलेच पसंत पडत होते.मात्र 2000 सालानंतर त्यांच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात अपयश आले.त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले.2007 साली त्यांनी केलेल्या शिवाजी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी 26 कोटी रुपये इतके मानधन घेतले होते व हा चित्रपट सुपर हिट ठरला.या चित्रपटानंतर रजनीकांत यांची गणना सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेत्यां मध्ये केली जाऊ लागली.यानंतर आलेल्या रोबोट या चित्रपटांनेही जगभरामध्ये भरपूर कमाई केली.

1981 साली रजनीकांत यांनी विवाह केला.रजनीकांत यांना दोन मुली सुद्धा झाल्या. ऐश्वर्या आणि सौंदर्या या रजनीकांत यांच्या दोन मूली आहे. ऐश्वर्या चित्रपट निर्माती व दिग्दर्शक असून तिने अभिनेता धनुषसोबत विवाह केला आहे. तर सौंदर्या हीसुद्धा निर्माती , दिग्दर्शिका व ग्राफिक प्रोड्युसर आहे.

रजनीकांत यांनी अभिनय क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले होते.2000 साली त्यांना पद्मभूषण या भारत सरकारच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला.45 वर्षांच्या त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामा बद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.2014 साली रजनीकांत यांना तामिळनाडू सरकारने स्टेट फिल्म पुरस्काराने सन्मानित केले होते.